श्लोक 17.24
प्रवर्तन्ते विधानोक्ता: सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४ ॥
शब्दार्थ
तस्मात्-म्हणून; ॐ-ॐकारापासून प्रारंभ करून; इति-याप्रमाणे; उदाहत्य-निर्देश करून; यज्ञ-यज्ञाचा; दान-दान; तपः-आणि तप; क्रियाः-क्रिया; प्रवर्तन्ते- प्रारंभ करतात; विधानउक्ताः-शास्त्रोक्त; सततम्—सतत; ब्रह्म-वादिनाम्-ब्रह्मवादी
भाषांतर
म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी, शास्त्रोक्त विधिविधानांनुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मवादी, या सर्व क्रियांचा ॐकारापासून आरंभ करतात.
तात्पर्य
ॐ तद् विष्णो: परमं पदम् (ऋग्वेद १,२२,२०) श्रीविष्णूंचे चरणकमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. भगवंतांप्रीत्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्माची निश्चितपणे परिपूर्णता होते.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com