वेदाबेस​

श्लोक 17.19

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तप: ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९ ॥
mūḍha-grāheṇātmano yat
pīḍayā kriyate tapaḥ
parasyotsādanārthaṁ vā
tat tāmasam udāhṛtam

शब्दार्थ

मूढ-मूढ; ग्राहेण-प्रयत्नाने, आत्मनः-स्वत:च्या; यत्-जे, पीडया-पीडाकारक; क्रियते-केले जाते; तपः-तप; परस्य-इतरांना; उत्सादन-अर्थम्-विनाश करण्याकरिता; वा-किंवा; तत्–ते; तामसम्—तामसिक; उदाहतम्—म्हटले जाते.

भाषांतर

आत्म-पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते.

तात्पर्य

हिरण्यकशिपूसारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली. अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली; परंतु अखेरीस भगवंतांनी त्याचा संहार केला. अशक्यप्राय: गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या होय.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com