वेदाबेस​

श्लोक 17.12

अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२ ॥
-

शब्दार्थ

अभिसन्धाय-इच्छा ठेवून; तु-परंतु; फलम्-फळाची; दम्भ-दंभ; अर्थम्-च्या साठी; अपि-सुद्धा; च-आणि; एव-निश्चितपणे; यत्-जे; इज्यते-केले जाते; भरत-श्रेष्ठ-हे भरतश्रेष्ठा; तम्—ते, यज्ञम्—यज्ञ; विद्धि—जाण; राजसम्—राजसिक गुणामध्ये

भाषांतर

परंतु, हे भरतश्रेष्ठा! दंभार्थ किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाणा.

तात्पर्य

काही वेळा कर्मकांडे आणि यज्ञ हे स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याकरिता किंवा इहलोकी लाभप्राप्ती करण्यासाठी केले जातात. असे यज्ञ किंवा कर्मकांड राजसिक असल्याचे समजले जाते.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com