वेदाबेस​

श्लोक 11 .24

नभ:स्पृशं दीप्‍तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्‍तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४ ॥
-

शब्दार्थ

नभः-स्पृशम्-आकाशाला जाऊन भिडलेले; दीप्तम्—तेजस्वी; अनेक-अनेक; वर्णम्—रंग; व्यात-आ वासलेले किंवा उघडलेले; आननम्-मुख; दीप्त-प्रदीप्त; विशाल-विशाल; नेत्रम्—नेत्र; दृष्ट्रा-पाहून; हि-निश्चितच; त्वाम्—तुम्हाला; प्रव्यथित-व्यथित झालेले; अन्तः-अंतरात; आत्मा-आत्मा; धृतिम्-धैर्य; न-नाही; विन्दामि-मला प्राप्त झालेले आहे; शमम्-मानसिक संतुलन; च-सुद्धा; विष्णो-हे भगवन् विष्णू,

भाषांतर

हे सर्वव्यापी विष्णू! अनेक तेजस्वी वर्णानी युक्त तुम्ही, आकाशास भिडलेली तुमची आ-वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com