वेदाबेस​

श्लोक 11 .12

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भा: सदृशी सा स्याद्भ‍ासस्तस्य महात्मन: ॥ १२ ॥
-

शब्दार्थ

दिवि-आकाशामध्ये; सूर्य-सूर्यांचे; सहस्रस्य-हजारो; भवेत्-जर होईल; युगपत्-एकाच वेळी; उत्थिता-प्रकट;यदि-जर; भाः-प्रकाश; सदृशी-सारखे; सा-ते; स्यात्-कदाचित; भासः -तेजः; तस्य-त्याचे; महा-आत्मनः-भगवान.

भाषांतर

आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल.

तात्पर्य

अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते तरीपण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते; परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी (हजारो सूर्यांशी) केली.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com