वेदाबेस​

श्लोक 10 . 41

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोऽशसम्भवम् ॥ ४१ ॥
-

शब्दार्थ

यत् यत्- जे जे; विभूति-ऐश्वर्यः मत्-युक्तः सत्त्वम्-अस्तित्व; श्री-मत्-सुंदरः ऊर्जितम्-तेजस्वी; एव-निश्चितच; वा-किंवा; तत् तत्-ते सर्व, एव-निश्चितच, अवगच्छ-जाण, त्वम्-तू, मम-माइया; तेज:-तेजाचा; अंश-एक अंश, सम्भवम्-उत्पन्न झाले.

भाषांतर

सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तूजाण.

तात्पर्य

आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही सुंदर किंवा तेजस्वी अभिव्यक्ती ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश असल्याचे जाणले पाहिजे. कोणतीही असामान्य ऐश्वर्यमय वस्तू श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे रूप आहे असे समजले पाहिजे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com