वेदाबेस​

श्लोक 8 . 26

श‍ुक्ल‍कृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ॥ २६ ॥
-

शब्दार्थ

शुक्ल—प्रकाश; कृष्णे-आणि अंधकार; गती-जाण्याचे मार्ग, हि-निश्चितच; एते-हे दोन; जगतः-भौतिक जगताच्या; शाश्वते-वेदांच्या; मते-मतानुसार; एकया-एकाने; याति-जातो; अनावृक्तिम्-पुन्हा न परतण्यासाठी; अन्यया-दुस-याने; आवर्तते-परत येतो; पुन:-पुन्हा.

भाषांतर

वैदिक मतानुसार, प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही; परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो.

तात्पर्य

आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून (५.१०-३-५) प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. जे सकाम कर्मी आणि दर्शनिक तर्कवादी आहेत ते अनादी कालापासून अविरतपणाने ये-जा करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com