वेदाबेस​

श्लोक 8 . 13

ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
-
vyāharan mām anusmaran
- prayāti tyajan dehaṁ
sa yāti paramāṁ gatim

शब्दार्थ

ॐ-ॐकार; इति-याप्रमाणे; एक-अक्षरम्-एक अक्षर; ब्रह्म-ब्रह्म; व्याहरन्-उच्चारण करीत, माम्—माझे (श्रीकृष्ण); अनुस्मरन्—स्मरण करीत; यः-जो; प्रयाति-जातो किंवा प्रयाण करतो; त्यजन्-त्याग करीत; देहम्-हे शरीर; सः-तो; याति-प्राप्त करतो; परमाम्-परम; गतिम्—गती,

भाषांतर

योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ॐकाराचे उच्चारण करीत, जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते.

तात्पर्य

या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ॐकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ॐकार होय; परंतु हरेकृष्ण ध्वनीमध्ये अॅंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/ हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार, निश्चितपणे आध्यत्मिक लोकांची प्राप्ती होते. कृष्णभक्त कृष्णलोक, गोलोक वृंदावनामध्ये, प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा, आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com