श्लोक 7 . 11
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥
शब्दार्थ
बलम्-बल; बल-वताम्-बलवानांचे; च-आणि; अहम्-मी आहे; काम-काम, वासना; राग-आणि आसक्ती; विवर्जितम्-रहित; धर्म-अविरुद्धः-जो धर्माच्या तत्त्वाविरुद्ध नाही; भूतेषु-सर्व प्राणिमात्रांमधील; काम:-कामजीवन; अस्मि-मी आहे; भरत-ऋषभ-हे भरत श्रेष्ठ अर्जुना.
भाषांतर
मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुन! धर्मतत्त्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे.
तात्पर्य
बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्त्वानुसार कामजीवन हे इंद्रियतृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्णभावनाभावितकरणे ही मातापित्याची जबाबदारी आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com