वेदाबेस​

श्लोक 3 . 14

अन्नाद्भ‍वन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञा‍द्भ‍‍वति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भ‍वः ॥ १४ ॥

शब्दार्थ

अन्नात्- अन्नापासून; भवन्ति-वाढतात; भूतानि-भौतिक शरीरे; पर्जन्यात्- पावसापासून; अन्न-अन्नाची; सम्भव:- निर्मिती; यज्ञात्- यज्ञ केल्यापासून; भवति- शक्य होते; पर्जन्य:- पाऊस; यज्ञ:- यज्ञ; कर्म-कर्म; समुद्भव:- प्रकट होते.

भाषांतर

सर्व प्राणिमात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसातून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो.

तात्पर्य

भगवद्गीतचे महान भाष्यकार श्रीबलदेव विद्याभूषण लिहितात ये इन्द्राद्यङ्गतयावस्थितं यज्ञं सर्वेश्वरं विष्णुमभ्यर्च्य तच्छेषमश्‍नन्ति तेन तद्देहयात्रां सम्पादयनित ते सन्त: सर्वेश्वरस्य यज्ञपुरुषस्य भक्ता: सर्वकिल्बिषैरनादिकाल-विवृद्धैरात्मानुभवप्रतिबन्धकैर्निखिलै: पापैर्विमुच्यन्त. भगवान जे यज्ञापुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात त्याप्रमाणे देवदेवता, भवगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरूण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करणास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणीपुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवेदवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्णभावनाभावित असणारे भगवद्भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे अध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस, साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्रीविष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवद्भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्णभावनाभावित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. याउलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्मांचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे, सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरले आहे आणि जो भगवद् प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो; पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगणयास पात्र होतो.

वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्यप्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात.जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांनासुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते. कारण पशूही वनस्पतीच खातात. म्हणून सरतेशेवटी आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावर अवंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र व सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत.भगवंतांना यज्ञाद्वारेचव संतुष्ट करता येते. म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वत:च टंचाईग्रस्त होईल. हा प्रकृतीचा नियमच आहे. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेषकरून संकीर्तन यज्ञ, हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com