श्लोक 18.68
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशय: ॥ ६८ ॥
शब्दार्थ
- — anyone who; idam — this; paramam — most; guhyam — confidential secret; mat — of Mine; bhakteṣu — amongst devotees; abhidhāsyati — explains; bhaktim — devotional service; mayi — unto Me; parām — transcendental; kṛtvā — doing; mām — unto Me; eva — certainly; eṣyati — comes; asaṁśayaḥ — without doubt.
भाषांतर
जो मनुष्य, भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल. यात मुळीच संशय नाही.
तात्पर्य
सामान्यतः सांगितले जाते की, भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्ये करावी, कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीताही जाणणे शक्य नाही किंवा श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य नाही. जे श्रीकृष्णंना आणि भगवद्गीतेला तत्वतः स्वीकारीत नाहीत त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये. जे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम हा विषय शुष्क ज्ञानींसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे. तथापि, जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वगृही, भगवद्धामात परत जातो.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com