श्लोक 18.39
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९ ॥
शब्दार्थ
यत्-जे; अग्रे-प्रारंभी; च-सुद्धा; अनुबन्धे-शेवटी; च-सुद्धा; सुखम्-सुख; मोहन-मोहमयी; आत्मन:-आत्म्याच्या; निद्रा-निद्रा; आलस्य-आळस; प्रमाद-आणि प्रमाद; उत्थम्—उत्पन्न; तत्—ते; तामसम्—तामसिक; उदाहतम्—म्हटले जाते.
भाषांतर
आणि जे सुख स्वरूपसाक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते.
तात्पर्य
जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय. तसेच ज्याला कार्य-अकार्य याची कल्पना नसते तो सुद्धा तमोगुणी होय. तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते. रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दु:ख असते, परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com