श्लोक 18.32
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धि: सा पार्थ तामसी ॥ ३२ ॥
शब्दार्थ
अधर्मम्-अधर्म; धर्मम्-धर्म; इति-असे; या-जी; मन्यते-मानते; तमसा-भ्रमाने; आवृता-आवृत झालेली; सर्व-अर्थान्-सर्व गोष्टींत; विपरीतान्-विपरीत मार्गाने; च-सुद्धा; बुद्धिः-बुद्धी; सा-ती; पार्थ-हे पार्थ; तामसी-तामसिक.
भाषांतर
भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय..
तात्पर्य
तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते. जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते. तमोगुणी मनुष्य, महात्म्याला साधारण मनुष्य तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात. त्यांना सत्य हे असत्य वाटते आणि ते असत्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात. सर्व गोष्टींत ते केवळ विपरीत मार्गाचेच अनुसरण करतात, म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com