वेदाबेस​

श्लोक 18.26

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित: ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकार: कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६ ॥
-

शब्दार्थ

मुक्त-सङ्गः-सर्वं भौतिक संसर्गापासून मुक्तः अनहम्-वादी-मिथ्या अहंकाररहित; धृति-निर्धार; उत्साह-आणि उत्साह; समन्वितः-योग्यः; सिद्धि-सिद्धी; असिद्धयोः-आाणि अपयशात; निर्विकार:-निर्विकार, कर्ता-कर्ता, सात्विक:-सत्वगुणी; उच्यते-म्हटला जाती.

भाषांतर

जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता, मिथ्या अहंकाराविना, निश्चयाने आणि उत्साहाने, यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे महटले जाते.

तात्पर्य

कृष्णभावनाभावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपविलेले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार व गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणा-या क्लेशांची तो चिंता करीत नाही, तो नेहमी उत्साहपूर्णच असतो. तो यश किंवा अपयशाची पर्वा करीत नाही व सुखदुःखात समान वृत्ती बाळगतो. असा कर्ता सत्वगुणी असतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com