श्लोक 18.23
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३ ॥
शब्दार्थ
नियतम्—नेमलेले, सङ्ग-रहितम्—आसक्तीरहित, अराग-द्वेषतः—आसक्ती व द्वेष न ठेवता, कृतम्-केले जाते; अफल-प्रेप्सुना-फलप्राप्तीची इच्छा न धरणाच्या मनुष्याकडून; कर्म-कर्म; यत्-जे; तत्-ते; सात्विकम्-सात्विक; उच्यते-म्हटले जाते.
भाषांतर
जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात.
तात्पर्य
विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रांतील नियत कर्मे, जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय, राग-द्वेष भावरहित, भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता व आत्मतृप्तीचा हेतून ठेवता कृष्णभावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com