वेदाबेस​

श्लोक 18.16

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु य: ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मति: ॥ १६ ॥
-

शब्दार्थ

तत्र-तिथे; एवम्-असे; सति-असल्यामुळे; कर्तारम्-कर्ता; आत्मानम्-स्वत:ला; केवलम्-केवळ; तु-परंतु;य:-जो; पश्यति-पाहतो; अकृत-बुद्धित्वात्-बुद्धी नसल्यामुळे; न-नाही; सः-तो; पश्यति-पाहतो; दुर्मतिः -मूर्ख

भाषांतर

म्हणून या पाच कारणांचा विचार न करता, ज्याला वाटते की, तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.

तात्पर्य

मूर्ख मनुष्याला समजत नाही की, परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे व त्याच्या कर्माचे संचालन करीत आहे. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वत: भगवानच असतात. म्हणून मनुष्याने केवळ या चार भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. जो परमात्म्याला पाहात नाही तो स्वत:लाच कर्ता मानीत असती.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com