वेदाबेस​

श्लोक 13.28

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं य: पश्यति स पश्यति ॥ २८ ॥
-

शब्दार्थ

समम्—समभावाने, सर्वेषु—सर्वामध्ये; भूतेषु—जीव;तिष्ठन्-तम्—वास करणारा; परम-ईश्वरम्— परमात्मा; विनश्यत्सु-नश्वर; अविनश्यन्तम्-अविनाशी; यः-जो; पश्यति-पाहतो; सः-- तो; पश्यति—वास्तविकपणे पाहतो.

भाषांतर

जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणा-या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की, नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो.

तात्पर्य

जो मनुष्य सत्संगाद्वारे शरीर, शरीराचा स्वामी किंवा जीव आणि जीवाचा मित्र या तीन गोष्टींना संयुक्तपणे पाहतो तो यथार्थ ज्ञानी होय. जोपर्यंत मनुष्याला, आध्यात्मिक विषयांचे ज्ञान असलेल्या यथार्थ ज्ञानीचा सत्संग प्राप्त होत नाही तोपर्यंत तो या तीन गोष्टींना पाहू शकत नाही. ज्यांना असा सत्संग लाभलेला नाही ते अज्ञानीच असतात असे अज्ञानी लोक केवळ शरीरच पाहतात आणि त्यांना वाटते की, शरीराच्या नाशाबरोबर सर्वच गोष्टींचा विनाश होतो; परंतु ही वस्तुस्थिती नाही. शरीराच्या नाशानंतर जीव आणि परमात्मा विविध प्रकारच्या चर आणि अचर पदार्थांमध्ये नित्य भ्रमण करीतच असतात. परमेश्वर या संस्कृत शब्दाचा अनुवाद काही वेळा जीवात्मा असा केला जातो, कारण जीव हा देहाचा ईश्वर असतो आणि शरीराच्या विनाशानंतर तो दुसरे रूप धारण करतो. या अर्थाने तो ईश्वर आहे. परंतु इतर काहीजण परमेश्वर शब्दाचा अनुवाद परमात्मा असे करतात. दोन्ही दृष्टीने जीवात्मा आणि परमात्मा हे अस्तित्वात असतात. ते नश्वर नाहीत. जो या प्रकारे पाहतो तो वास्तविकपणे काय घडते ते पाहू शकतो.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com