वेदाबेस​

श्लोक 11.34

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च
कर्णं तथान्यानपि योधवीरान् ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्‍नान् ॥ ३४ ॥
-
- - yodha-vīrān
mayā hatāṁs tvaṁ jahi mā vyathiṣṭhā
yudhyasva jetāsi raṇe sapatnān

शब्दार्थ

द्रोणम् च-द्रोणसुद्धा; भीष्मम् च-भीष्मही; जयद्रथम् च-जयद्रथही; कर्णम्-कर्णः; तथा— तथा; अन्यान्-अन्य; अपि-खचितच; योध-वीरान्-महान योद्धे;मया- माझ्याकडून; हताम्-पूर्वीच मारलेले; त्वम्-तू; जहि-मार; मा-नको; व्यथिठाः-व्यथित; युध्यस्व-केवळ युद्ध कर; जेता असि-तू जिंकशील; रणे-युद्धात; सपत्नान्-शत्रू

भाषांतर

द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धयांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील.

तात्पर्य

प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते. परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की, जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. म्हणून जीवनाचे रहाटगाडे अशा पद्धतीने चालवावे, जेणेकरून प्रत्येकजण कृष्णभावनाभावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com