श्लोक 18.74
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ ७४ ॥
ity ahaṁ vāsudevasya
pārthasya ca mahātmanaḥ
saṁvādam imam aśrauṣam
adbhutaṁ roma-harṣaṇam
शब्दार्थ
सञ्जय उवाच-संजय म्हणाला; इति-याप्रमाणे; अहम्-मी; वासुदेवस्य-श्रीकृष्णांचा; पार्थस्य-आणि अर्जुन; च-सुद्धा; महा-आत्मनः-महात्म्यांचा; संवादम्-संवाद; इमम्-हा; अश्रौषम्-ऐकला; अद्भुतम्-अद्भुत; रोम-हर्षणम्-रोमांचकारी, संजय म्हणाला,
भाषांतर
संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे.
तात्पर्य
भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की, कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले? संजयाचे गुरू व्यासदेव यांच्या कृपेने सा-या घटना संजयाच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या. याप्रमाणे त्याने युद्धभूमीचा सारांश वर्णित केला. त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता. कारण दोन महात्म्यांमधील असा महत्त्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तींविषयी आणि स्वतःविषयी, जीवांचे प्रतिनिधित्व करणा-या महान भगवद्भक्त अर्जुनाला सांगत होते. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल. संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसतसा त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे.
BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.
©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education
www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.
for further details please contact- info@vedabace.com