वेदाबेस​

श्लोक 18.29

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श‍ृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९ ॥
buddher bhedaṁ dhṛteś caiva
guṇatas tri-vidhaṁ śṛṇu
procyamānam aśeṣeṇa
pṛthaktvena dhanañ-jaya

शब्दार्थ

बुद्धे:-बुद्धीचे; भेदम्-भेद; धृते:-स्थैर्य, निश्चय; च-सुद्धा; एव-निश्चितपणे; गुणत:- प्राकृतिक गुणांद्वारे; त्रि-विधम्-तीन प्रकारचे; श्रुष्णु-ऐक; प्रोच्यमानम्-मी सांगितल्याप्रमाणे; अशेषेण-विस्ताराने किंवा तपशीलवार; पृथक्त्वेन-वेगवेगळे; धनञ्जष्य-हे धनंजय.

भाषांतर

हे धनंजय! प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक.

तात्पर्य

आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार तीन निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कत्र्याची बुद्धी आणि धृती (निश्चय) यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहेत.

BACE: Aiming to Teach Vedic Culture All Over the Globe.

©2020 BACE- Bhaktivedanta Academy of Culture and Education

www.vedabace.com is explanation of Vedic knowledge with detail information which can be useful in daily spiritual practice and studies and research.

for further details please contact- info@vedabace.com